अमळनेर:- शहरातील भुयारी गटार व रस्त्यांचे काम पूर्ण करा असे निवेदन मनसेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत आता कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
अमळनेर शहरात अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामांमुळे चांगले रस्ते खोदून खराब झाले होते. त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होत होते. नागरिकांना रहदारीसाठी, वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने भुयारी गटारी व रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून काम लवकर पूर्ण करून नागरिकांचे हाल थांबावेत अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. नगरपालिका या कामांना सुरुवात केली असून मनसेने केलेल्या मागणीला यश आले आहे.