अध्यक्षपदी वाल्मीक पवार यांची तर उपाध्यक्षपदी तुषार सैंदाणे यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी वाल्मीक सुरेश पवार यांची तर उपाध्यक्षपदी बोदर्डे येथील तुषार सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्याप्रसंगी दोन्ही गावातील सरपंच उपसरपंच तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, लोकनियुक्त सरपंच काशिनाथ माळी, उपसरपंच योगेश सोनवणे, शिक्षक हर्षल सोनवणे, लोण येथील सरपंच कैलास पाटील, माजी सरपंच नारायण पाटील, विकी सूर्यवंशी, लोणचारम येथील दीपक पाटील, भटू पाटील, रावसाहेब पाटील, हेमंत सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, पप्पू पाटील, दिलीप पाटील, देवेंद्र गिरासे, उदय वसंतराव सोनवणे, प्रदीप पाटील, अशोक पाटील, दिलीप देशमुख, नाटुलाल चौधरी, अशोक पाटील आदी मान्यवर यांनी उपस्थिती देत नवीन पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं. कर्मचारी प्रदीप पाटील, सरदार कोळी यांचे सहकार्य लाभले