
अमळनेर:- संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

सकाळी मंदिरात महाआरती, अभिषेक, लघु रुद्राभिषेक व महिला वारी प्रमुख ज्योती पवार व सर्व गजानन परिवारातील महिलांनी गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे वाचन केले. यावेळी तालुक्यातील महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने ज्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्यांचा मंदिरात गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा आर बी पवार, ज्योती पवार यांनी सत्कार केला. दुपारी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अविनाश सोनार, नितीन भावे, अशोक भावे, जयवंत पाटील आनंद पाटील, मोहित पवार, परेश पाटील, चेतन उपासनी, प्रवीण पवार श्रीकृष्ण चव्हाण, रघुनाथ पाटील, गुलाब पाटील, विश्वास पाटील, एल.जे चौधरी, पंकज वाणी, विजय वाणी, अनिल पाटील, संजय पाटकरी, संदीप पाटील, सिद्धांत पाटील , ज्योती पवार ,सुनिता खोंडे, शोभा कोळी, वंदना भारती, बबीता पवार, इंदिरा येवले ,कविता येवले,सुनिता पाटील, संगिता पाटील, यांच्यासह सर्व गजानन भक्तांचे सहकार्य लाभले.







