अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर गावाच्या पुढे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर धुळे येथे उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दिनांक १३ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता किसन ठेलारी हा टॅक्सीने गावी जात असताना जैतपिर गावाच्या पुढे दोन दुचाकी रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्याने टॅक्सी थांबवत पाहिले असता दोन दुचाकीचा अपघात होवून दोन्ही दुचाकीस्वार एकमेकांच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यापैकी एक पुंडा मुन्ना ठेलारी (रा. सोनगीर) हा असून दुसरा अनोळखी होता. अँब्युलन्स आल्यानंतर दोन्हींना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्या अनोळखी इसमास धुळे येथे उपचारार्थ रवाना केले व पुंडा मुन्ना ठेलारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किसन ठेलारी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. सचिन निकम हे करीत आहेत.