
निंभोरा येथील घटना, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे लाईट बिल वाटण्याच्या वादातून तीन जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मनोहर दगडू धनगर हे दिनांक १४ रोजी गावात लाईट बिल वाटप करत असताना घरासमोर राहणारे प्रमोद बापू कोळी व विनोद बापू कोळी हे आले असता फिर्यादीने त्यांना सांगितले की, तुमचे आत्याचे बिल तुमच्या काकुकडून घेवून घ्या. त्याचा राग आल्याने दोन्ही जण फिर्यादीच्या अंगावर धावून आले व चापट बुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यावेळी फिर्यादीची पत्नी व मुलगा भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. तसेच बापू महादू कोळी हे काठी घेवून आले व फिर्यादीस व त्याच्या मुलास मारहाण करू लागले. यावेळी गावातील लोकांनी हे भांडण सोडवून त्यांना दवाखान्यात दाखल केले. यावेळी फिर्यादीच्या पत्नीच्या कानातील दागिने हे गहाळ झाले असून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरुद्ध मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो करीत आहेत.







