अमळनेर:- अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासाठी आंदोलनास जुक्टो संघटनेने पाठिंबा देत तसे पत्र दिले आहे.
अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारी २०२३ पासून विविध मागण्यासाठी सुरु होणाऱ्या आंदोलनास स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना याच्याकडून जाहीर पाठिबा देण्यात आला. त्यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, सदस्य राकेश निळे,नरेंद्र सातपुते यांना विविध मागण्यासाठी होणाऱ्या आंदोलनास पाठिबापत्र देतांना जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, प्रा.आर.एम. पारधी, प्रा.सुनिल पाटील, प्रा. किरण पाटील,प्रा. बी.आर. संदानशिव, प्रा. डी.के.तायडे, प्रा.सी.आर. पाटील, प्रा.आर.एस. महाजन, प्रा.योगेश वाणी,प्रा. विलास पाटील आदी उपस्थित होते.