
नाशिक आपचे नेते जितेंद्र भावे यांनी पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद…
अमळनेर:- सर्वत्र राजकीय उदासीनता असताना आम आदमी पार्टी जनतेच्या पसंतीस उतरली असून राजकीय पोकळी भरून काढायला एकमेव पर्याय आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे युवा नेते जितेंद्र भावे यांनी केले.
ते अमळनेर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते. नाशिकची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले जितेंद्र भावे व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर येथे येऊन आम आदमी पार्टीचे कामाची दखल घेत अधिक जोमाने कामास लागण्याचे आवाहन केले. या बैठकीत तालुकाध्यक्ष संतोष पाटील, शिवाजी पाटील, धनंजय सोनार, प्रा. गणेश पवार, नाना पाटील, स्वप्नील पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. अमळनेर विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या या बैठकीस आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील, सल्लागार धनंजय सोनार , जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार, आप शेतकरी संघटनेचे राज्य सचिव शिवाजी पाटील, जिल्हा सचिव डॉ. महेश पवार, तालुका सचिव नाना अभिमान पाटील, संघटक राजेंद्र भाऊराव पाटील, सहसचिव स्वप्निल पाटील, एरंडोल अध्यक्ष एम के पाटील, सलीम वायरमन शेख, लियाकत पठाण, डॅनी, नारायण पाटील, महिला तालुका अध्यक्षा मनीषा नारायण पाटील, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.




