अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
दि.१३ एप्रिल रोजी प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सचिन पाटील यांचा पीएचडी व्हायवा झाला. विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांचेकडून नोटिफिकेशन सर्टिफिकेट देण्यात आले.या यशाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर पाठक (मार्गदर्शक )यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन हरी भिका वाणी, व्हा. चेअरमन योगेश मुंदडा, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य प्रा. डॉ. अरुण जैन, सह सचिव डॉ. धीरज वैष्णव,मा. सर्व उप प्राचार्य, जिमखाना प्रमुख डॉ. विजय तुंटे, प्रा. अमृत अग्रवाल,मा. सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी आमदार डॉ. बी एस. पाटील, विद्यापीठाचे मा. कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी सर,क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील सर, प्रा. आय. एच. पाटील, डॉ.सौ. सुगंधा पाटील, प्रा. अरुण शंकर पाटील,प्रा. अर्चना पाटील, सागर पाटील, रेवती पाटील, प्रेरिता, तनिष्का सर्व पाटील कुटुंबातील सदस्य, मित्र मंडळी, हितचिंतक यांनी डॉ. सचिन पाटील यांचे अभिनंदन केले आहे.