निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांला मिळाली जिल्हा स्तरावर संधी…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील रहिवासी समाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण चळवळीत आपल्या कामातून वेगळी छाप सोडणारे घनश्याम पाटील यांची भाजपा युवामोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रथमच पातोंडा गावातुन एका निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांला जिल्हा स्तरावर महत्वाच्या पदाची जबाबदारी मिळाली असल्याने ग्रामस्थांमधून व पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
घनश्याम पाटील हे स्व.उदय वाघ व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षनिष्ठेने काम करीत असून त्यांनी आतापर्यंत कोणतेही पदावर न असता केवळ आपल्या राजकीय व प्रशासकीय व्यक्तींशी चांगला सबंध ठेवून हुशारीने गावांत कोट्यावधी कामांचा पायाभुत विकास करून दाखवलेला आहे. पाणी फौंडेशन, बिहार पॅटर्न, जलयुक्त शिवार,माझी वसुंधरा अभियान सह अनेक कामात त्यांनी लक्षवेधी निस्वार्थी भावनेने काम केले असून भारतीय जनता पार्टीतून त्यांनी गावात व पंचक्रोशीत पक्षाचा प्रसार विचारसरणी पसरवली असून त्याच कामाचे फलित म्हणून त्यांची पातोंडा गावातुन जिल्हा स्तरावर मोठ्या पदावर निवड झाली. त्यांच्या ह्या निवडीचे खा.उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, मा.आ.स्मिता वाघ यांच्याकडून स्वागत करण्यात आले.