अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना २९ मे रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९ मे रोजी सकाळी आईवडील बाहेर सरपण आणण्यासाठी गेले तसेच लहान भाऊ हा खेळण्यासाठी बाहेर गेला असल्याने १७ वर्षीय मुलगी घरी एकटी होती. दुपारी २ वाजता आईवडील घरी परतले असता मुलगी न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे चौकशी केली असता कोणताही तपास न लागल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. मुलीच्या आईवडिलांनी एका तरुणावर संशय व्यक्त केला असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना.सचिन निकम हे करीत आहेत.