अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे लोकांकडून पैसे स्वीकारून आकडा घेणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळमसरे येथे लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार मटका खेळ सुरू असून कारवाई करण्याचे आदेश सपोनि शितलकुमार नाईक यांनी दिल्याने हेकॉ फिरोज बागवान, पोना सुनील तेली, पोकॉ राजेंद्र पाटील यांनी छापा टाकला असता बस स्टँड परिसरात सुदाम बारकु भील (वय २६) हा पान टपरीच्या आडोश्याला आकडा घेताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून आकडा स्वीकारण्याचे साहित्य आढळून आले असून पोकॉ राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मुं.जु. ॲक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.