
अमळनेर:- येथील आर्यन बारसकरने मुंबई येथे झालेल्या इंटरनॅशनल बॉडीबिल्डिंग स्पर्धत तिसरा क्रमांक पटकावला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबई येथे २७ मे रोजी झालेल्या इंटरनॅशनल आयसीएन बॉडीबिल्डिंग या स्पर्धत शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कु.आर्यन बारसकर या तरुणाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत त्याला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून अश्या प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवणारा तो अमळनेर शहरातील प्रथम बॉडीबिल्डर असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील, अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, सिद्धांत पाटील, मयूर बारसकर, विठ्ठल पाटील यांनी त्याचा सत्कार केला.







