अमळनेर:- राज्य मार्केटिंग फेडरेशन व पणन योजनेअंतर्गत अमळनेर तालुका खरेदी संघ विक्री संघाच्या ज्वारी व मका (भरडधान्य) खरेदीच्या नोंदणीसाठी १५ जूनपर्यंत शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाने याआधी ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याबाबत कळविले होते. आता पुन्हा नावनोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. नोंदणी करता शेतकऱ्यांना चालू हंगामाचा पीक पेरा नोंद असलेला शेतकऱ्यांचा ७/१२,बँक खात्याची पासबुक अथवा रद्द धनादेश तसेच आधारकार्डची छायांकित प्रत व शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक लागणार आहे. खरेदी केंद्रातर्फे ज्वारीसाठी २९७०, तर मक्यासाठी १९६२ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे.