
अमळनेर:- येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.
यासाठी अमळनेर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयात १४ ते २६ जून पर्यंत अर्ज विक्री सुरु राहणार आहे. दि १६ जुन ते ३० जुन पर्यंत अर्ज स्विकृती ची मुदत असणार आहे. अमळनेर तालुक्यातील ६४ गावातील ७२ महिला अंगणवाडी मदतनीसांच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दि १४ जून ते २६ जून दरम्यान शासकीय सुटी वगळून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात अर्ज विक्री होणार आहेत. भरतीसाठी उमेदवार किमान १२वी पास असणे आवश्यक असून १८ ते ३५ वयमर्यादा अट असणार आहे. तर विधवा उमेदवारास ४० वर्ष वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयांमध्ये नोटीस देवून गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील यांनी दिली आहे.
या गावात होणार पदभरती व कंसात रिक्त पदे….
चोपडाई (१), जानवे(१), रणाईचे (१), टाकरखेडा(१), देवगाव देवळी (२), पिळोदा (२), बहादरवाडी (१), हिंगोने खु. (१), इंदापिंप्री (१), मंगरूळ (२), शिरूड (१), दहीवद (२), दापोरी खू (१), दापोरि बु (१), गंगापुरी (१), खापरखेडा (१), खवशी (१), मठगव्हाण (१), पातोंडा (२), जवखेडा (१), अंचलवाडी (१), शिरसाळे (१), आर्डी (१), ढेकु चारम (१), मांडळ (१), आनोरे (१), झाडी (१), खेडी (१), मारवड (३), सात्रि (१), अंतूर्ली (१), खापरखेडा (१), डांगरी (१), भिलाली (१), निम (२), गलवाडे खु (१), गलवाडे बु (१), धानोरा (१), भरवस (१), ब्राम्हणे (१), एकतास (१), एकलहरे (१), मूडी प्र.डा. (१), लोण सिम (१), चाकवे (१), ढेकू बु. (१), जूनोने (१), कुऱ्हे बु (१), लोने (१), पळासदडे (१), दोधवद (१), गडखांब (१), हिंगोने खु. (१), जळोद (१), कचरे (१), मांजर्डी (१), नगाव खु. (१), पिंपळी (१), अमळगाव (१), राजोरे (१), जानवे (१), अमोदे (१), वावडे (१), ढेकू खु. (१) आदी







