“बाप” या विषयावर आयोजित या स्पर्धेत खान्देशातील ४९ कवींनी घेतला सहभाग…
अमळनेर:- येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने पितृ दिनानिमित्त आयोजित खान्देशस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल काल पितृदिनाच्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे.
“बाप” या विषयावर आयोजित या स्पर्धेत खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ४९ कवींनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या ६ स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत तर प्रथम १० कवींना मसाप शाखेच्या वतीने लवकरच आयोजित कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. काव्य स्पर्धेचा निकालात प्रथम योगिता पाटील (चोपडा), द्वितीय प्रकाश पाटील, (पिंगळवाडे), तृतीय दत्तात्रय कुळकर्णी,(जामनेर) उत्तेजनार्थ – जयराम मोरे, (सोनगीर), गो.शि. म्हस्कर,(नगरदेवळा), रमेश धनगर,(गिरड) यांची निवड करण्यात आली असून सर्व विजेत्या स्पर्धकांचे मसाप शाखेचे कार्याध्यक्ष रमेश पवार,प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ. रमेश माने व सर्व कार्यकारी मंडळाने अभिनंदन केले आहे.