मारवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील दोधवद येथे जागेच्या वादातून तिघांनी मिळून एकास मारहाण करत पाइपलाइनची तोडफोड करत नुकसान केल्याने मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी योगेश एकनाथ सैदाणे (वय ३८) यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू असून दिनांक १८ जून रोजी ते बाथरूम व सांडपाण्याचे कनेक्शन जोडत असताना घराशेजारी राहणाऱ्या मंगल ज्ञानेश्वर पाटील ह्या आल्या व शिवीगाळ करत वाद घालून मी विष पीवून तुमच्या विरुद्ध तक्रार देते असे सांगत निघून गेल्या. त्यानंतर ११ वाजता सरलाबाई ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर दलपत पाटील, कमलबाई भटूसिंग राजपूत हे तिघे आले व मंगलबाई घरी नाही तू कसे काय काम करत आहे ? अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने ही जागा आमची असून आमच्याच जागेत काम करत आहे असे म्हणताच सरलाबाई हिने काठी आणि लाथेने फिर्यादीस मारहाण केली व ज्ञानेश्वर याने कुदळने पाइपलाइन फोडत तिघांनी मिळून खोदलेला शोषखड्डा बुजवून टाकला. त्यावेळी फिर्यादीचे आई वडील व भाऊ त्याठिकाणी आले असता त्यांना ही या तिघांनी शिवीगाळ केल्याने योगेश सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत भादवि कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहेत.