अमळनेर:- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे गावठी दारू विकणाऱ्या एकाला मारवड पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
प्र. डांगरी येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पीएसआय विनोद पाटील यांना मिळाल्याने त्यांनी हेकॉ सचिन निकम व पोना सुनील तेली यांना सोबत घेत डांगरी येथे छापा टाकला असता रमेश बंडू वडर दोन ड्रम व प्लास्टिक पिशव्या घेवून गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने आढळून आला. त्याच्याकडून २४०० रू. किमतीची साठ लिटर दारू आढळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आली असून आरोपीस ताब्यात घेत मुं.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.