अमळनेर:- येथील शौर्य चंद्रशेखर ठाकूर याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याचे पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात होणार आहे. त्याच्या यशाचे कौतुक केले जात आहे.
शौर्य चंद्रशेखर ठाकूर हा इयत्ता पाचवीला सेंट मेरी हायस्कूल येथे शिकत होता. त्याने नवोदयची परीक्षा 2023 ला दिली होती. त्यात तो उत्तीर्ण झाला असून त्याचे सिलेक्शन झाले. तो लोण ग्रुप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर देवाजी ठाकूर आणि उपशिक्षिका सोनाली चंद्रशेखर ठाकूर यांचा मुलगा आहे. त्याला आईवडील आणि सेंट मेरी हायस्कूल येथील शिक्षक आणि प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. नवोदय विद्यालयातील प्रवेशामुळे त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला एक वेगळा आयाम मिळणार आहे.