अमळनेर:- शहरातील प्रताप मिल कम्पाउंड परिसरात असणाऱ्या एका घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरात राहणाऱ्या कैलास शांताराम बिरारी यांच्या घरी दिनांक २० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा टॅमीच्या सहाय्याने कडी कोंडा तोडून घरातील कपाटात असणाऱ्या सुमारे १७ ग्रॅम वजनाचे ४२ हजार ५०० रुपये किंमत असलेली मंगल पोत, व चार ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे कानातील कर्णफुले व खिशातील नऊ हजार रुपये रोख असा ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम ४५७, ३८० नुसार अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.