
२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी ते शिंदखेडा तालुक्यातील पढावद या गावांना जोडणारा पांझरा नदीवर पूल होणार असून त्यासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील तांदळी, शहापूर शिवारात शिंदखेडा तालुक्यातील पढावद आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत व बाराही महिने इकडून तिकडे येजा असते म्हणून पढावद ग्रामस्थांनी आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पुलाची मागणी केली होती, त्यासाठी माजी केंद्रीयमंत्री सुभाष भामरे व जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र वाढीव निधी लागणार असल्याने माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्यामार्फत दिनांक १६ जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याने तांदळी व पढावद येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय उत्तमराव पाटील यांनी दिली, यामुळे शेतकऱ्यांनी माजी मंत्री जयकुमार रावल व माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे आभार मानले आहेत.








