अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली येथे गावठी दारू विकणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील अंतूर्ली येथे गावठी दारू सुरू असल्याची माहिती सपोनि शितलकुमार नाईक यांना मिळाल्याने त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पीएसआय विनोद पाटील, हेकॉ संजय पाटील, सुनील आगोणे, पोकॉ अनिल राठोड यांनी छापा टाकला असता अंतूर्ली ते तासखेडा पुलाजवळ बोरी नदीच्या काठी दीपक महादू भील हा गावठी दारू विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याजवळ १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू मिळून आली असून नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. मारवड पोलीसात दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.