
५ कोटी १० लाख निधी खर्चून झाले पुलाचे काम, आ. रावल यांनी केली पाहणी…
अमळनेर:- खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान व तापी व पांझरा नदी संगमावरील पुरातन कपिलेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी सुलवाडे धरणाच्या बॅकवाटरमुळे तसेच चार महिने पावसाळ्यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे मुडावद ग्रामस्थांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पुलाची मागणी केली होती. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५ कोटी १० लाख निधीची तरतूद केली असून या पादचारी पुलाचे काम सुरु आहे. आगामी श्रावण महिन्यात कपिलेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तो खुला करण्यात येईल, अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी दिली.
या पादचारी पुलाच्या कामाची पाहणीप्रसंगी त्यांनी कपिलेश्वर येथे भेट दिली. या वेळी अभियंता व कार्यकर्ते उपस्थित होते. कपिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करून शिंदखेडा तालुक्यातील मुडावद ते कपिलेश्वर महादेव मंदिर दरम्यान पांझरा नदीवर पादचारी पुल बांधला जात आहे. या कामाची नुकतीच माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी पाहणी केली. या पुलाचे काम जलद गतीने होत असून आगामी महिन्यात हा पादचारी पुल पूर्ण होऊन भक्तांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती आमदार रावल यांनी दिली. या वेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सपना वारुडे, नथा वारुळे, डी. आर. बोरसे, अरुण पाटील, भाजप महिला मोर्चाच्या माधुरी शिसोदे, उपअभियंता संजय सूर्यवंशी, शाखा अभियंता चेतन देवरे, विवेक थोरकर, ठेकेदार दीपक जैन, मुडावदचे सरपंच सुरेंद्र चौधरी, दिलीप पाटील, मंगेश सोनवणे, सुभाष सोनवणे, खंडेराव महाजन, भानुदास महाजन, सुरेश पवार, राकेश पवार, नाना चौधरी, जगन्नाथ तामखाने, मुरलीधर चौधरी, देवमन बोरसे, दिवेश वारुडे, निखिल शिसोदे, विनीत शिसोदे, पढावद येथील चंपालाल पाटील, संदीप पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.








