अध्यक्षपदी दिलीप गांधी व त्यांच्या टीमने स्वीकारला पदभार…
अमळनेर:- येथील लायन्स क्लब अमळनेरचा चा ५५ वा पदग्रहण सोहळा अविनाश शर्मा (अबू रोड,राजस्थान), पीएमजेएफ गिरीश सिसोदिया(जळगाव), एमजेएफ हिना रघुवंशी (नंदुरबार) यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ जून रोजी बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहात पार पडला.
यावेळी लायन्सच्या नवनियुक्त प्रेसिडेंट पदी दिलीप गांधी, सेक्रेटरीपदी दिनेश मणियार, खजिनदारपदी पंकज मुंदडे, तर लिओ च्या प्रेसिडेंट पदी प्रणित झाबक, सेक्रेटरी वेद पाटील, खजिनदार चिराग मुंदडे यांनी पदभार स्वीकारला.याप्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार स्मिता वाघ यासह शहरांतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.याप्रसंगी २०२२-२३ चे मावळते प्रेसिडेंट योगेश मुंदडे,सेक्रेटरी महावीर पहाडे, खजिनदार अनिल रायसोनी, लिओ चे प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल, सेक्रेटरी मिहीर पवार,खजिनदार कौशल गोलच्छा यांनी पदभार नूतन पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. लायन्स व लिओ च्या माध्यमातून मागील वर्षात केल्याल्या सामाजिक तसेच इतर कार्याचा आलेख उपस्थितांसमोर मांडण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी अविनाश शर्मा, गिरीश सिसोदिया, आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डिगंबर महाले व प्रा नयना नवसारीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.