
मुनव्वर खान व अब्दुल हमीद शेख यांचा अमळनेर येथे केला सत्कार…
अमळनेर:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मुन्नवर खान तर जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अब्दुल हमीद शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल अमळनेर काँग्रेस कमिटी व अल्पसंख्याक विभागातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतपेढी येथे अमळनेर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, शहराध्यक्ष जुबेर पठाण यांच्यातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,माजी नगरसेवक मुन्ना शर्मा,नगरसेवक नरेंद्र संदानशिव, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सचिव रज्जाक शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी डी पाटील,डबीर पठाण, अहमद मिस्तरी,सईद तेली,इम्रान शेख, अझहर सैय्यद, राजू भाट, तौसिफ तेली तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








