अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथील रहिवासी शितल कोळी यांनी “जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण स्त्रियांचा सामाजिक व आरोग्य विषयक अभ्यास” या विषयांमध्ये समाजशास्त्र शाखेतून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली आहे.
लहानपणापासून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांचे जवळून अनुभव असल्याने त्यांना नेहमीच या स्त्रियांचा समस्यांना कुठेतरी अधोरेखित करावे याबाबत मनातून वाटत होते. याकरिता त्यांनी आपल्या संशोधनाचा विषय देखील जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण स्त्रियांचा सामाजिक व आरोग्य विषयक अभ्यास असा निवडला याकरिता त्यांना प्राचार्य डॉ. मोरे कल्याण विठ्ठल, बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वलवाडी, धुळे यांचे संशोधन मार्गदर्शन लाभले. शितल कोळी यांनी कोरोना सारख्या कालावधीत देखील आपले संशोधन कार्य अविरतपणे सुरू ठेवले. याकरिता सर्व स्तरावर त्यांचे कौतुक करण्यात येत आहेत. त्या प्वीण कोळी (कक्ष अधिकारी मंत्रालय) यांच्या पत्नी असून पांडुरंग नत्थु कोळी, सेवानिवृत्त बँक अधिकारी, व शोभा कोळी यांच्या स्नुषा आहेत.