आषाढी एकादशीनिमित्त मुस्लिम बांधवांनी दिली नाही कुर्बानी..
अमळनेर:- शहरात २९ जून गुरुवार रोजी बकरी ईदची नमाज इदगाह मैदानावर सकाळी ७:३० वाजेची वेळ ठेवण्यात आली होती परंतु रात्रीपासुन सतत पाऊस सुरू असल्याने शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने निर्णयानुसार शहरातील सर्व मस्जिदीत बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली.
शहरातील विविध मशिदीत पंधरा मिनिटांच्या अंतरावर ईदची नमाज पठण करण्यात आली. शेवटची नमाज ८: ३० वाजता जामा मस्जिद कसाली मोहल्ला येथे संपन्न झाली नमाज पठण नंतर सर्व बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच आषाढी एकादशी निमित्त कोणीही कुर्बानी केली नाही. संपूर्ण शहरात ईद व आषाढी दोन्ही सण उत्साहात व शांततेत पार पडले.