वृक्षांना नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे भाविकांना आवाहन…
अमळनेर:- येथील श्री. अंबरीष ऋषि महाराज टेकडीवर आज दिनांक ३० रोजी यात्रोत्सव असून श्री. अंबरीष महाराज मंदिर संस्थांन व टेकडी ग्रुप तर्फे यात्रेला येणाऱ्या भाविकांचे अंबरीष टेकडी ग्रुप कडून स्वागत व पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.
श्री. अंबरीषजी ऋषि महाराज व टेकडी परिसराचे विशेष महत्व आहे श्री अंबरीषजी ऋषि हे मोठ्या कुल घराण्यातील १६ वे गादीपुरुष राजा होते व ते दंडयोग तपश्चर्यासाठी हिमालय पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर अमळनेर येथील टेकडीच्या पठारावर त्यांनी जपतप तपश्चर्या करुन श्रीहरी विष्णु देवता व शिवशंकर देवताची आराधना करुन टेकडी पावन केली. तसेच या टेकडीवर आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने टेकडी ग्रुपने टेकडी परिसरात वृक्ष लावणे व जगवणे तसेच चारी खणुन पाणी जिरविण्याचे व ड्रमच्या सहाय्याने टेकडी परिसराच्या सर्वच वृक्षांना पाणी देण्याचे कार्य हे श्रमदानातुन व लोकसहभागातुन टेकडी ग्रुप करत आहे. आजवर टेकडी परिसरात जवळपास पर ३५०० वृक्षरोपण केले आहेत. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे दैविक कार्य हे करत आहे. व दिनांक ८ जुलै २०१८, रविवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरिष टेकडीवर १ मिनिटात १,१११ वृक्षारोपणाच्या आदर्श पर्यावरणपूरक अभिनव राष्ट्रीय उपक्रम राबविला आहे.अंबरिष टेकडीवर आजपर्यंत शेकडो झाडे लावून ती वाढविली आहेत. त्यामुळे अंबरिष टेकडीचे पर्यावरण बदलून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे. टेकडीवर यात्रेला किंवा यात्रेनंतर कधीही आल्यावर नास्ता व जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद, युज अँड थ्रो काही वस्तु, रद्दी, पेपर अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता सरळ आपण आणलेल्या पिशवीत भरुन ती पिशवी टेकडी ग्रुप सदस्यांकडे जमा करावी किंवा श्री. अंबरीषजी ऋषि महाराज मंदिरा जवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागिल बाजूस नेऊन टाकावा असे आवाहन केले आहे.
श्री.अंबरीषजी महाराज टेकडी परिसरात टेकडी ग्रुपने वृक्षारोपण केले असून आपल्या पाल्यासारखे संगोपण व संरक्षण केले आहे. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या भाविकांना विनंती केली की, आपण आपआपल्या गाड्या व मोटारसायकली टेकडीच्या खालच्या बाजुस लावावी व चालतांना फिरतांना आपल्या मुळे आपल्या पायदळी वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच टेकडीच्या खाली पायऱ्याजवळ व सी.सी.टी, अंतर्गत बंधाऱ्याचे खोलीकरण पाणी अडविण्यासाठी काम सुरु आहे. तरी येतांना व जातांना काळजीपुर्वक लक्ष ठेवून सावधानीने टेकडी भ्रमण करावी व जिथे पाण्याचा डाब दिसेल तिथे कृपया जाऊ नये किंवा पाण्यात उतरु नये असेही आवाहन करण्यात आले आहे.