
बाजार समितीत मंत्री अनिल पाटील यांची केली लाडू तुला…
मोफत प्रधानमंत्री पीक विमा योजना सहायता कक्षाचा शुभारंभ…
अमळनेर:- कृषी उत्पन्न बाजार समितीने पीक विमा योजना सहायता कक्ष सुरू करून महाराष्ट्रात आपली छबी उमटवण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन मंत्री अनिल पाटील यांनी बाजार समितीच्या सत्काराला उत्तर देताना केले.

अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाले म्हणून आणि ५६ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची लाडू तुला करण्यात आली. वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी मोफत प्रधानमंत्री पीक विमा योजना सहायता कक्षचा शुभारंभ मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ज्या बाजार समितीच्या सभापती पदावरून आमदार होण्याचे स्वप्न पाहिले त्या बाजार समितीत मंत्री म्हणून सत्कार स्वीकारताना आंनद वाटतो. बाजार समितीचे व कर्मचाऱ्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांना मोफत पीक विमा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिता वाघ व भाजपच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार साहेबराव पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ अनिल शिंदे, सुषमा देसले,डॉ अशोक पाटील, समाधान धनगर, पुष्पा पाटील, नितीन पाटील, वृषभ पारेख, प्रकाश वाणी,शंकर बितराई, हरी वाणी, बजरंग अग्रवाल, जितेंद्र जैन, यतीन कोठारी, सचिव डॉ उन्मेष राठोड, हमाल मापाडी संघटना शरद पाटील, प्रा सुरेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शीतल देशमुख, महेंद्र बोरसे, श्याम अहिरे, कर्मचारी संघटना, गटसचिव संघटना हजर होते. प्रास्ताविक करताना सभापती अशोक पाटील म्हणाले की मंत्री पद मिळाल्याने तालुका प्रगतीत चार पावले पुढे राहणार आहे म्हणून बाजार समितीने देखील प्रगतीत एक पाऊल पुढे टाकून शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी एक पैसाही लागणार नाही. सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.







