
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील २१ वर्षीय तरुण कोणास काही न सांगता घरातून निघून गेला असून त्याच्या भावाच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वावडे येथील हरिश्चंद्र सुकदेव अहिरे (वय २१) हा घरातील कोणालाही न सांगता दिनांक ४ रोजी संध्याकाळी ६ वाजेनंतर घरातून निघून गेला. त्याने नुकतेच नाशिक येथून मॅकेनिकल डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या तो वावडे येथे घरीच राहत होता. घराच्या सदस्यांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला असता आजपावेतो तो मिळून न आल्याने त्याचा भाऊ समाधान सुकदेव बौद्ध यांच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मपोह रेखा भरत इशि ह्या करीत आहेत







