गं स हायस्कूल येथे नागरिकांच्या भेटी घेत निवेदने स्वीकारून करणार चर्चा…
अमळनेर:- जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ग स हायस्कूल मध्ये सकाळी १० वाजता तालुक्यातील सर्व विभागाच्या शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यांनतर तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तर साडे बारा वाजता नागरिकांच्या भेटी व निवेदने स्वीकारून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास माध्यमाचे प्रतिनिधी आणि पत्रकारांशी प्रशासकीय विषयावर चर्चा करणार आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारी अथवा काही समस्या असल्यास ग स हायस्कूल मध्ये येवून जिल्हाधिकारी समोर मांडाव्यात असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.