
अमळनेर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे अमळनेर येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन समाजातर्फे धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील आशिष शिरसाळे यांच्या खुनातील आरोपीना मदत करणाऱ्या मंडळाधिकारीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अमळनेर दंगलीतील अशपाक शेख याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, रेणापूर येथील मातंग बांधवांच्या खून करणाऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी, भूम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीना शिक्षा व्हावी, जळगाव जिल्ह्यत महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, परळीच्या जरीन खान याच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, भीमराव वानखेडे, प्रमोद इंगळे, जितेंद्र केदार, संगीता साळुंखे, राहुल सुरवाडे, भगवान धनगर, प्रवीण सपकाळे, ललित घोगले, दाजीबा गव्हाणे, मनोज अडकमोल, संदीप सैंदाणे, गुलाब कोळी, विशाल बागुल, गौतम पवार, वाल्मिक सोनवणे, विलास चव्हाण, सागर निकम, राहुल चव्हाण, सुजाता जोशी, दिगंबर सोनवणे, खंडू महाले, रवींद्र पाटील, रियाजोद्दीन शेख हजर होते.







