
श्री. सो. स. कासार समाज पंच मंडळातर्फे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
अमळनेर:- निवघा (ता. मुदखेड जि. नांदेड) येथील आरोपी ज्ञानेश्वर पवार यांच्यावर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार ) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी श्री. सो. स. कासार समाज पंच मंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन विद्यार्थिनीचा गावगुंड ज्ञानेश्वर ऊर्फ सोन्या याने मागील वर्षभरात अनेकवेळा छेडछाड करुन अतोनात छळ केला आहे. त्याच्या छळामुळे अखेर १२ जुलै रोजी या अल्पवयीन मुलीचा बळी घेतला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे या गावगुंडावर पोस्को बाल लैंगिक अत्याचार कायदयांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी समस्त कासार समाजाची मागणी आहे. आपल्या शासनात महिला, युवती व विद्यार्थीनींमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा गांवगुंडावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आज अशा घटनेमुळे समाजमन खिन्न झाले आहे. जनसामान्यात रोष निर्माण झाला असून या गुंडावर वेळीच आळा घालून महिला, मुलींना सुरक्षीततेचे वातावरण निर्माण करणेसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. नांदेड पोलिस अधिक्षकांना तात्काळ आरोपी ज्ञानेश्वर पवार वर पोस्को बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात यावे अथवा संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाजाला पिडीत कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा उपाध्यक्ष प्रकाश अंधारे, शितल कासार, परेश कासार, सुभाष कासार, अनिल अंधारे, संजय वसंत अंधारे, दत्तात्रय अंधारे, नितीन वैद्द, संजय वैद्द, संजय वैद्द, दिनेश मुळे, विजय पातुरकर, मेहश कासार, विनायक हुंगे, संजय अंधारे, संजय बळवंत अंधारे, शितल विभाकर अंधारे, दीपक कोळपकर, उमेश अंधारे, नरेंद्र कासार, दर्शन कासार आदींनी दिला आहे.







