अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते व आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सुखदेव कोळी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन टोकरे कोळी युवा मंचकडून शहादा येथील झालेल्या कोळी समाजाच्या परिषदेत कोळी समाजाचे संघटक जेष्ठ मार्गदर्शक घुमन बाबुराव कोळी यांच्याहस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभागी होत कोळी समाजाच्या युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, विविध योजना, संघटना वाढीसाठी समाज जागृती, पथनाट्ये सादरीकरण करून प्रबोधन व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, कुर्हाड बंदी सारखे कार्यक्रम राबवत केलेल्या कार्याची दखल घेऊन कोळी समाजाच्या परिषदेत सागर कोळीला समाजरत्न पुरस्काराने घुमन कोळी यांच्याकडून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक भगवान कोळी, मित्तल ग्रुपचे जगदीश बागुल, पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी, शहादा येथील पत्रकार गोपीचंद बोरसे यांची विशेष उपस्थिती होती. सागर कोळीला समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने पाडळसरे परिसरातून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.