ग्रामीण युवकांचा एमपीएससीत टक्का वाढला:- डीवायएसपी सुनील नंदवाळकर…
अमळनेर:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले. यासाठी त्यांची मेहनतीने ,जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी कष्ट घेतले म्हणून यश त्यांचा वाट्याला आले आणि ग्रामीण युवकांचा एमपीएससीत टक्का वाढला असे प्रतिपादन अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदावळकर यांनी खेडी प्र.ज. येथे मंत्रालयीन क्लार्क पदी निवड झालेल्या शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्राचा सार्वजनिक सत्कार प्रसंगी केले
तालुक्यातील खेडी(प्र. ज) येथील चंद्रशेखर अजाबराव पाटील या शेतकरी पुत्राची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मंत्रालय क्लार्क या पदावर नुकतीच निवड झाली त्या निमित्ताने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदावळकर यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एसएनडीटी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा शाम पवार हे विराजमान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर हे उपस्थित होते. सोबत मंचावर सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा वर्गाचे संचालक विजयसिंग पवार, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गंभीरराव शिंदे, खेडीच्या सरपंच आशाताई पाटील, उपसरपंच शोभाताई पाटील मंचावर उपस्थित होते
आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांतर्फ शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार गौरविण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस नंदवाळकर यांनी “स्पर्धा परीक्षा हे काळाचे द्योतक आहे, गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी, सचोटी, इमानदारी,व ध्येय गाठण्यासाठी कष्ट केले पाहिजे असे प्रतिपादन केले. तर विजयसिंग पवार यांनी स्पर्धा परीक्षाचे अभ्यासाचे नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना चंद्रशेखर याने “माझ्या यशा मागे माझे गुरुजन, आईवडील, भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे, यापुढे मी माझ्या मातीतील माणसांना जेवढे जास्तीत जास्त शक्य होईल अशी मदत करेल”, असे प्रतिपादन केले. चंद्रशेखर हा फिजिक्स विषयातून एमएस्सी झाला असून मागच्या काही वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याप्रसंगी प्रा डी डी पाटील,पोलीस उपनिरीक्षक गंभीरराव शिंदे यांनी ही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा शाम पवार यांनी स्व साहेबराव देवचंद पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले. हा कार्यक्रम राजमुद्रा अभ्यासिका व स्व नानासाहेब साहेबराव देवचंद पाटील सार्वजनिक वाचनालय खेडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा अभ्यासिकेतील समाधान पाटील, वाल्मिक पाटील,कृष्णा पाटील, नरेंद्र पाटील, मयूर पाटील,सारंग पाटील सह विलास शिंदे, तानाजी पाटील, नामदेव पाटील,गुलाबराव पाटील, डॉ संजय पवार,ज्ञानेश्वर शिंदे, भास्कर पाटील,राहूल पाटिल, अजबराव पाटील, सुनिल पाटील, प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कैलास पाटील यांनी, सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी व आभार प्रा जिजाबराव पाटील यांनी मानले.