आईला मारण्याची देत असे धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल..
अमळनेर:- सावत्र बापानेच आईला मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरात घडली असून पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध पोक्सोसह अन्य गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादीत नमूद केल्यानुसार आरोपीने पीडित मुलीच्या आईशी दुसरा विवाह केला होता. दीड वर्षांपासून आरोपी, पीडित मुलगी, तिची बहीण व आई असे सर्व एकत्र राहत असत. सावत्र वडील व आई यांच्यात भांडण झाले की, तिची आई बाहेरगावी निघून जात असे.रात्रीच्या वेळी आरोपी पीडित मुलीच्या जवळ येऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत असे. मुलीने विरोध केल्यानंतर तिला व तिच्या आईला मारण्याची धमकी देत असल्याने मुलगी भीतीपोटी सहन करीत होती.२३ एप्रिल रोजी तसेच १५ जुलै रोजी असेच भांडण झाल्यानंतर आरोपीने याने आपल्या सावत्र मुलीवर बळजबरीने अत्याचार केले. १९ रोजी मुलीची आई तिच्या आजीसोबत बाहेरगावाहून आल्यानंतर अखेर मुलीने आपबिती त्यांना कथन केली आणि अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा व भादवि ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.