अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे झालेल्या वादात आता दुसऱ्या गटातर्फे ही दोन जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून ॲट्रोसीटीसह अन्य कलमाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी दुर्गाबाई भगवन भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १९ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सुदाम भगवन भील हा मजुरांसोबत बसला असताना वकील पद्माकर पाटील व दादू पद्माकर पाटील हे आले व सूदामची गच्ची पकडुन अश्लील शिवीगाळ करत मारहाण करू लागले. त्यावेळी फिर्यादी दुर्गाबाई भांडण सोडवण्याकरता गेली असता तिला देखील मारहाण व शिवीगाळ केली. त्यावरून मारवड पोलिसांत भादवि कलम २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अ.जा.ज. सुधारणा २०१५ चे कलम ३(१) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास डीवायएसपी सुनिल नंदवाळकर हे करीत आहेत.