अमळनेर:- तालुक्यातील धार येथील ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे.
तालुक्यातील धार येथील बापू दयाराम भिल (वय ४५) याने २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेतला. सोगन भाईदास भिल याने मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल नेहा बारेला करीत आहेत.