
अमळनेर:- वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर प्रकार तीन महिन्यांनी सीसीटीव्हीतून उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयतांचे नाव असून नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नरेंद्र यास काल दि. 22 रोजी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 25 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.







