
नागरिकांनी न.पा. गाठत मुख्याधिकारी सरोदेंना दिले निवेदन…
अमळनेर:- शहरातील प्रभाग क्र. पाचमधील जापान जिन परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची व गटारींची दुरावस्था झालेली असून नागरिकांकडून अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलेले आहे तरी आजतागायत कुठलीच कारवाई न झाल्याने नागरिकांनी नगरपरिषद गाठत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
सध्या पावसाळा सुरू असून त्या भागात रस्त्याचे पाणी निघायला गटारी नाही. त्यामुळे ते पाणी रस्त्यावरच साचत आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरल्यास त्याला नगरपरिषद जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला असून येथून शाळेत जाणारे लहान मुले व नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध वृद्ध लोकांचे हाल होत आहेत तरी ह्या समस्या सोडवाव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना हे निवेदन देतेवेळी अजहर अली सैय्यद,इम्रान शेख, नविद शेख, आसिफ अली, फारूक शेख, सैय्यद नबी, रिसालात अली, मोहसीन शेख, एजाज शेख, अजहर अली, मकसूद अली यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.







