मारवड पोलिसांनी केली कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे व लोण खुर्द येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त करून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना गोपनीय माहिती मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, भरत गायकवाड, भरत ईशी, अनिल राठोड ,गुलाब मांगो महाजन यांना लोण खु व शिरसाळे बु येथे गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी पाठवले. पोलिसांना लोण ते झाडी रस्त्यावर किशोर अधिकार भिल वय ३६ हा गावठी दारू विकताना आढळून आला. त्याच्याजवळून १८०० रुपये किमतीची २१ लिटर दारू जप्त करण्यात आली. तर तेथेच बाजूला सुखदेव धनसिंग भिल वय ४७ याची गावठी दारूची हातभट्टी सुरू होती. पोलिसांनी १ हजार रुपयांचे २५ लिटर कच्चे रसायन,३ हजार रुपये किमतीचे ७ लहान प्लास्टिक ड्रम व २ मोठे ड्रम गूळ मिश्रित रसायन तसेच १५ लिटर दारू जप्त करून भट्टी उश्वस्त केली. तर शिरसाळे येथे छापा टाकून सुमनबाई गोरख भिल वय ५५ हिला देखील दारू विकताना पकडले असता तिच्या कडून १५०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. या गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी व महिला हेडकॉन्स्टेबल रेखा ईशी करीत आहेत.