३१ जुलै पर्यंत मुदत,शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-जयश्री पाटील
अमळनेर:- पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 साठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रचार वाहन अमळनेर तालुक्यात कार्यरत करण्यात आले असून याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकरे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक तालुका युवकाध्यक्ष विनोद जाधव, रामेश्वरचे बाळू पाटील, तालुका युवक उपाध्यक्ष मुन्ना पवार, मनोज बोरसे आदीसह शेतकरी बांधव कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच पिक विमा तालुका प्रतिनिधी किरण पाटील उपस्थित होते. दरम्यान या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जयश्री पाटील यांनी केले आहे.