
जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त केले वृक्षारोपण…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु येथील कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय वृक्षदिंडी व स्वराज्य प्रतिष्ठान गोंदुर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयच्या प्रांगणात वृक्षारोपण करुन वृक्ष जोपासण्याची व संवर्धनाची शपथ घेण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील सुप्रसिध्द शल्य चिकित्सक डॉ. चेतन पाटील होते. निसर्ग मित्र समिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर माजी उपशिक्षणाधिकारी डी.बी. पाटील, चेतन भदाणे, विवेक पाटील प्रतिमा पूजन केले. यावेळी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वृक्ष लागवडीचे महत्व वेगवेगळे फायदे यांच्यावर मनोगत व्यक्त करण्यात आले. गाणी लेझीम खेळत गावामध्ये वृक्षदिंडी पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावातल्या लोकांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यात आले
प्रशासकिय अधिकारी डी. बी. पाटील, माजी एस. एन पाटील, बी. टी. पाटील, माजी मुख्याध्यापक गोसावी सर,एस. डी. सुर्यवंशी, जे.एम सोनवणे मुख्याध्यापक वाणी सर, एस. व्ही. पाटील, तर निसर्गमित्र समिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी उदाहरण हरित वसुंधरेचे संवर्धन करूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया विद्यार्थ्यांसमोर एक उदाहरण दिले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, आजी माजी प्राचार्य मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ भीमराव पाटील, अशोक पाटील, युवराज पाटील व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकम सर यांनी, प्रास्ताविक जगदिश पाटील सर, आभार प्रदर्शन डी. बी. पाटील सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक देसले, सी एम पाटील,गोपाळ पाटील, रुपाली मॅडम, शिरसाठ मॅडम, अंकुश पाटील, अशोक मोरे, अहीरे भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले.







