
अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद यांच्याकडून निधी येवून इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश राजपूत, लोकनियुक्त सरपंच संगीता महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य व वि.का.सोसायटी चेअरमन, सदस्य, पालक वर्ग आणि गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गणवेश मिळाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने यांनी परिश्रम घेतले.







