
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककामार्फत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. दिलीप कदम यांनी केले,तर या कार्यक्रमाचे व्याख्याते प्राध्यापक व्हि.डि. पाटील होते,त्यांनी याप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जीवनपट मांडून त्यांच्या जहालवादाचा इतिहास प्रस्तुत केला. यानंतर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आपले समारोपात त्यांचे साहित्यिक योगदान मांडले. आणि फकीरा मधून त्यांनी कशाप्रकारे वास्तव भारताचे चित्रण केले हे मांडले.आणि यासह त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जनजागृतीच्या शाहिरी कार्याचाही आढावा घेतला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







