
मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले कामाचे भूमिपूजन…
अमळनेर:- येथील नगर परिषद हद्दीतील मुंदडानगर लगतच्या ओम शांती नगर येथील खुला भूखंड गट क्र.१४३७ वरील नगर परिषद निधीतून होणार्या ग्राउंड काँक्रिटीकरण, वायर फिनिशिंग वॉल कंपाऊंड व जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शुभ हस्ते करण्यात आले.
ओम शांती नगर भागातील स्थानिक नागरिक नवरात्री मध्ये मोठ्या उत्साहाने सालाबादाप्रमाणे उत्सव याठिकाणी साजरा करतात. त्यांच्या मागणीनुसार ग्राउंड काँक्रिटीकरण, वायर फिनिशिंग वॉल कंपाऊंड व जॉगिंग ट्रॅक कामांसाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी पाठपुरावा करून काम मंजूर करण्यात आले होते. याकामी मुख्याधिकारी डॉ प्रशांत सरोदे, विक्रांत भास्करराव पाटील, विक्की जाधव यांचे सहकार्य मिळाले. भूमिपूजन कार्यक्रमास अनिल शिसोदे, एल.टि. नाना पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील यांचेसह लहू पाटील, भरत ठेकेदार, गुलाब गायकवाड, विलास आप्पा, श्रीराम मराठे, नवल पाटील, शांताराम पाटील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







