गडखांब शिवारातून ४८०० मीटर विजेच्या तारा अज्ञात चोरट्याने नेल्या कट करून…
अमळनेर:- रिलायन्सच्या मोबाईल टॉवर वरून दोन रिमोट रेडिओ युनिट सह केबल असा ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी बहादरपूर रस्त्यावर घडली.
बहादरपूर रस्त्यावरील टॉवर बंद असल्याने टेक्निशियन भिकन युवराज पाटील याला सागर गजानन पाटील यांचा फोन आला की, आपल्याला दुरुस्तीसाठी जायचे आहे. तेथे गेल्यावर त्यांना समजले की, दोन रेडिओ रीमोट डीव्हाईस व केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. भिकन पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत
तसेच तालुक्यातील गडखांब शिवारातून विजेच्या २० खांबांवरून अज्ञात चोरट्याने अल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेपुर्वी घडली आहे. गडखांब शिवारातील यशवंत भटा पाटील (रा पिंपळी), मुरलीधर माणकू पाटील (रा पिंपळी), संतोष लोटन पाटील (रा गडखांब), गोकुळ सुदाम महाजन (रा पिंपळी) आदींच्या शेतातील खांबावरील ३२ हजार रुपये किमतीच्या ४८०० मीटर विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत. वीज तंत्रज्ञ अविनाश गोसावी यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.