विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत दिले नियुक्तीपत्र..
अमळनेर:- अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली त्या बैठकीत राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
खा. शरदचंद्र पवार, प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या सोबत एकनिष्ठेने राहून अमळनेर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागळापर्यंत पोहोचविण्याचा मानस सर्व पदाधिका-यांनी आज केला. त्याप्रंसगी प्रदेश सरचिटणीस व नाशिक ग्रामीण जिल्हा निरीक्षक तिलोत्तमा पाटील, महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य तसेच प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर, राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष तडवी, पारोळा तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते डॉ. संजय पवार, ॲड. हर्षलताई चित्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवि जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. त्याप्रंसगी किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, सडावण सरपंच आप्पासाहेब सावण, मधुकर पाटील, सचिन पाटील, भोलाणे सरपंच शिवाजी पाटील तसेच मोठया प्रमाणात सरपंच आणि उपसरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.