नगरपालिकेतर्फे अमृतमहोत्सवाच्या सांगता वर्षांच्यानिमित्ताने आयोजन…
अमळनेर:- अमळनेर नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता वर्षं निमित्ताने आयोजित माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत १२ रोजी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वसुधा वंदन अमृत वाटिका अंतर्गत ७५ वृक्षांचे वृक्षारोपण शहरातील आर.के.नगर भागातील सर्वज्ञ नगर भागात करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पंचप्राण अभियानांतर्गत मेरी माती मेरा देश अंतर्गत शपथ घेतली. यावेळी मुख्यधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, भूषण भदाणे, तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.