तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रवाश्यांनी केली मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे बारा वाजले असून जीवघेण्या खड्ड्यांमूळे प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
तालुक्यातील मंगरूळ ते जवखेडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. मात्र या रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना अक्षरशः कसरत करून जावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून वाहनाचे व वाहनधारकांचे नुकसान होत आहे. या रस्त्यावरून मंत्री व अधिकारी हे नेहमी जात असतात मात्र रस्त्याची किरकोळ डागडुजी करण्याचे कष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग घेत नसून लवकरात लवकर या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देवून डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.