चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी मालवाहू गाडी पलटी झाली असून मारवड पोलिसांत ड्रायव्हरविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दिनांक १३ रोजी एम १८ बिजी ४७९० क्रमांकाचा कीटक नाशक औषधी वाहून नेणारा मालवाहू ट्रक गुजरात राज्यातील दहेज येथून अकोल्याकडे जात असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास एकलहरे गावाजवळ भरधाव वेगाने जात असताना वळणाच्या रस्त्यावर क्लिनर साइडला पलटी झाला. यात ड्रायव्हर संजय सोनवणे व मालक सुनील तिरमले यांना दुखापत झाली असून गाडीचे व मालाचेही नुकसान झाले आहे. भरधाव वेगाने गाडी चालविल्याने ड्रायव्हर संजय सोनवणे यांच्याविरुद्ध मालक सुनील तिरमले यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम हे करीत आहेत.